October 24, 2025

बारामतीच्या शोरूमवर काम करताना एकाची अकस्मात मयत.

IMG_20240720_163420

बारामती : शहरातील फलटण रोडवरील टाटा शोरुमच्या वाशिंग सेंटरमध्ये कामावर असलेल्या सचिन दादासाहेब कुंभार ( वय 18 ) याचा काम करीत असताना शुक्रवार दि. अचानक चक्कर येवून पडल्याने मृत्यु झाला आहे.

सचिन हा नेहमी प्रमाणे दुपारी टाटा शोरूममध्ये काम करीत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडला त्याला तातडीने भोईटे हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र औषध उपचारापूर्वीच सचिनचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी साहिल शब्बीर सय्यद यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे तर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मयत दाखल केली आहे.

प्रत्याक्षात सचिनचा वाशिंग सेंटरमध्ये काम करीत असताना गंभीर रीत्या इलेक्ट्रिक शॉक लागून जागीत मृत्यु झाला आहे, तसे शासकीय रुग्णालयाचे शवविच्छेदन प्रमाणपत्र आहे, तरी देखील शोरूम चालकांनी पोलिसांपासून मुख्य घटनाक्रम लपविला आहे. तर प्रत्यक्ष सचिनचे वय देखील 17 वर्षे आहे,  मात्र फिर्याद दाखल करीत असताना वय देखील 18 पूर्ण असे दिले आहे. आता येणाऱ्या काळात पोलिस या प्रथम खबरी अहवाल आणि पुढील तपास प्रकरणी काय भूमिका घेणार आणि सचिनला कश्या प्रकारे न्याय देणार हे येणाऱ्या काळात निष्पन्न होईलच. 

You may have missed

error: Content is protected !!