बारामतीतील अधिकारी लाच घेताना, लाच लुचपथ प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..
बारामती : बारामतीत सर्वसामान्य नागरिकांची कामे आर्थिक तडजोड केल्याशिवाय होत नाहीत,लाच दिल्याशिवाय कामे होत नाही नाहीतर हेलपाटे मारावे लागतात, याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. बारामतीच्या सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी लाच घेताना रंगेहात लाचलुचपथ प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, कोर्टात दाखल असलेल्या दाव्याची स्टे ऑर्डर बारामतीच्या सहायक निबंधक कार्यालयातील जमा करुन घेण्यासाठी अधिकारी अनिलकुमार संभाजी महारनवर(वय ४६) यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन साडे चार हजार रुपये लाच स्वीकारताना सहायक निबंधक संस्था, बारामती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे ही कारवाई शुक्रवारी (दि.19) सहायक निबंधक सहकारी संस्था, बारामती यांच्या दूसऱ्या मजल्यावरील प्रशासकीय भवन येथे करण्यात आली. अनिलकुमार संभाजी महारनवर असे लाच घेताना पकडलेल्या सहकारी अधिकाऱ्याचे नाव असून. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या जमिनी संदर्भात विभागीय सह निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या कोर्टात दावा दाखल केला होता त्या निर्णयाविरोधात. फिर्यादी यांनी न्यायालयाकडून स्टे ऑर्डर आणली आहे. या स्टे ऑर्डर ची कॉपी जमा करण्यासाठी तक्रारदार हे सहायक निबंधक सहकारी संस्था, बारामती यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी सहकारी अधिकारी महारनवर यांची भेट घेतली. त्यावेळी महारनवर याने काम करण्यासाठी व मदत करण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे येथील लाच लुचपथ प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पुणे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणी दरम्यान अनिलकुमार महारनवर याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष पाच हजाराची लाच मागणी करुन तडजोडी अंती साडे चार हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना महारनवर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाच स्वीकारणारे अधिकारी अनिलकुमार महारनवर यांच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन. ही कारवाई लाच लुचपथ प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, यांच्या पथकाने केली आहे.
