डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
बारामती : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले, म्हणुनच मराठी माणुस पेटुन उठला आणि त्यामुळेच मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली.18 जुलै ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रत्येक मराठी माणसाला मराठी असल्याचा स्वाभिमान अण्णाभाऊंनी पटवून चळवळ उभी केली. त्या काळात शाहीरी हे एक लोक चळवळीचे मोठे साधन होते म्हणूनच अण्णाभाऊ साठे अजरामर आहेत. आजही त्यांचे विचार मराठी माणसाला व चळवळीला प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करीत, वंचित घटकच्या अन्यायला खरी वाचा फोडली ती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी व पोवाड्यांनी, त्यांच्या कार्यामुळेच अन्याय दूर होण्यास चालना मिळाली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी व्यक्त केले.
यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनिल शिंदे, अशोकराव खंडाळे, मुख्याधापक उत्तम शिंदे, मुख्याधापक मोहन इंगळे यांनीही मनोगते व्यक्त केली यावेळी यावेळी पत्रकार निलेश जाधव, धनंजय तेलंगे, विशाल खंडाळे, पत्रकार किरण बोराडे, अंकुश मांढरे, मयूर सुतार, ओंकार जाधव, तुषार शिंदे, ऋषिकेश मांढरे, स्वप्नील सुतार,विजय तेलंगे व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
