“करियर कट्टा” युवकांच्या सर्वांगीण विकासासाठीचे नवं दालन

बारामती : “करिअर कट्टा च्या माध्यमातून युवकांना विकासाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी करिअर कट्टासारखं खुलं दालन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने उपलब्ध करून दिले आहे. करिअर कट्टासारख्या व्यासपीठामुळे महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्य युक्त यशस्वी भविष्य घडवता येईल. “करिअर कट्टाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव म्हस्के, यांनी विचार व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शारदानगर यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करियर कट्टा अंतर्गत, सेंटर ऑफ एक्सलन्स एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शारदानगर येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र गीताने सुरू झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभासाठी डॉ. ज्ञानदेव म्हस्के, . राज्यस्तरीय करिअर संसद, अध्यक्ष, प्राचार्य पी. व्ही. रसाळ, प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे, अध्यक्ष, राज्यस्तरीय सेंटर ऑफ एक्सलन्स समिती, प्राचार्य डॉ. डी.डी. पाटील, अध्यक्ष राज्यस्तरीय प्रशासन समिती, प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी, सदस्य, राज्यस्तरीय कौशल्य विकास समिती, प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर, सदस्य, करिअर संसद समिती, प्राचार्य डॉ.शरयु तायवाडे, अध्यक्ष, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार समिती, आशिष तिवारी, लायझनिंग ऑफिसर, पंतप्रधान युवा कौशल्य योजना, प्राचार्य जया तिवारी, व यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही. महामुनी यांनी केले. शारदाबाई पवार महिला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नव्याने नियुक्त झालेल्या करिअर संसदेतील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी व्यासपीठावर शपथ ग्रहण केली. राज्यस्तरीय करिअर संसद समितीचे अध्यक्ष प्राचार्य पी. व्ही. रसाळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने स्थापन झालेल्या करिअर कट्ट्याविषयीची भूमिका स्पष्ट केली. करियर कट्टा म्हणजे फक्त करिअरशीच निगडित उपक्रम यात नाहीत तर ती खूप व्यापक संकल्पना आहे. एक विद्यार्थी आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या सर्वार्थाने सर्व बाजूने घडावा त्याचबरोबर तळागाळातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हाच हेतू यामागे आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मा. श्री. यशवंत शितोळे अध्यक्ष, महाराष्ट्र समिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी करिअर संसद व करिअर कट्टामार्फत महाविद्यालयात आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.ए.आर. मुंगी तर आभार डॉ.आर.एस.सुरवसे यांनी मानले.
उद्घाटन समारंभाच्या औपचारिकतेनंतर प्राचार्य जया तिवारी व प्रा. सोनाली सस्ते यांनी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अद्यावत इनक्युबेशन सेंटर व याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सुविधा व करिअरच्या संधी याविषयी सादरीकरण केले. यानंतर मा. प्राचार्य डॉ.डी.डी. पाटील अध्यक्ष, राज्यस्तरीय प्रकाशन समिती यांच्या अध्यक्षतेखाली करिअरच्या संधी व उद्योजकता विकास या विषयावर चर्चासत्र व विद्यार्थ्यांसाठीचे स्टार्टअप कंपनी विषयी सादरीकरण झाले. त्यानंतर प्राचार्य महेंद्र रघुवंशी सदस्य, राज्यस्तरीय कौशल्य विकास समिती यांच्या अध्यक्षतेखाली युवा विकास केंद्र यांचे धोरण, विद्यार्थी संवाद वेळापत्रक, वार्षिक कृती आराखडा यांची निश्चिती करण्यात आली. सी. एस. आर. फंड डॉक्युमेंटरी त्याचबरोबर निधीचे वितरण आणि आवश्यक असणारी साधनसामग्री यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जुलै महिन्याच्या करिअर कट्टा मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. Ministry of Micro Small and Medium Enterprises च्या प्रस्तावाबाबत उपस्थितां सोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शतकोत्तर राजर्षी शाहू महाराज शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत यांनी पोवाडयाच्या माध्यमातून साथीदारांच्या सहकार्याने अतिशय उत्तमरित्या राजर्षी शाहू महाराजांच्या उदात्त सामाजिक कार्याबद्दल, विकासाच्या टप्प्याबद्दलच्या इतिहासाचे सादरीकरण केले. आपल्या सादरीकरणातून श्रोत्यांच्या समोर खरोखरचा इतिहासच उभा केला. सदर कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातील 120 प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
महाविद्यालयातील करिअर कट्टा समितीतील सदस्य प्रा. मनोज निंबाळकर, डॉ.योगेश फाटके, प्रा.नितीन खारतोडे, करिअर संसद मधील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांनी विविध जबाबदारी स्वीकारून कार्यशाळा यशस्वी केली. सदर कार्यशाळेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आर. निंबाळकर व विज्ञान शाखाप्रमुख डॉ. परिमिता जाधव उपस्थित होते.
सेंटर ऑफ एक्सलन्स एक दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे, मानव संसाधन व्यवस्थापक गार्गी दत्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे, संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार, चेअरमन राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.