October 24, 2025

विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिरच्या खेळाडूंची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

IMG-20240716-WA0059
बारामती : सीआयएससीई दिल्ली बोर्ड व डॉ. मार्थियो फिलीस स्कूल, धानोरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झोनल कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये १४, १७ व १९ वर्षाखालील गटात ३२४ मुले व मुलींनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर, बारामतीच्या शाळेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात आदिती शेरकर हिने सुवर्ण पदक मिळवले. १७ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत अर्श शेख व विनीत घोळवे यांनी रजत पदक मिळवले. १४ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात रम्या बर्डे हिने रजत पदक मिळवले. तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात सत्यम आटोळे याला रजत पदक प्राप्त झाले. आदिती शेरकर हिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड झाली.
सर्व खेळाडूंना कराटे कोच मिनानाथ भोकरे व क्रीडा शिक्षक जितेंद्र पटेल, नितीन जगताप व ऐनताज शेख यांनी मार्गदर्शन केले. विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, शाळेचे प्राचार्य आशिष घोष व उपप्राचार्या रुपाली जाधव तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातर्फे
खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

You may have missed

error: Content is protected !!