बापरे….बारामतीत सोळा तासात तीन घरफोड्या
बारामती : बारामतीत शहरात एकाच दिवशी ( सोळा तासात ) तीन घरफोड्या घडल्याची घटना घडली आहे, तर या तीन घटनेत साधारण दोन लाख पस्तीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
बारामती शहरातील जामदार रोड येथील घटनेत दि 14 जुलै रोजी भर दिवसा घरफोडी घडली असून यात अज्ञात चोरट्याने बंद दाराचा कडी-कोयंडा कापून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. यात चोरट्याने साधारण चोवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
तर दुसऱ्या घटनेत येथील विश्वास नगर येथील, देवराज अपार्टमेंटमधील एकाच वेळी दोन सदनिका चोरट्यांनी फोडल्या असून दोन्ही सदनिकामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम रुपये दोन लाख आकारा हजार दोनशे रुपये घरफोडी करून लंपास केली आहे. आसा साधारण तीन घरातील मिळून साधारण दोन लाख पस्तीस हजार सातशे रुपयांची घरफोडीचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादींनी दाखल केला आहे.
या प्ररकरणी युद्धपातळीवर पोलिस तपास करीत आहेत. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी बारामतीत साखळी घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याच धर्तीवर आता पुन्हा नव्याने घरफोडीच्या घटना घडत असल्याने बारामतीत नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
पोलिस यंत्रणा युध्द पातळीवर तपास करीत आहे, साखळी घरफोडीचा हा प्रकार नाही, मात्र नागरिकांनी जागरूक राहावे, भिऊ नेये, असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी नागरिकांना केले आहे.