छगन भुजबळ यांचा शरद पवारांवर घणाघाती आरोप…
बारामती : आरक्षणाच्या उद्द्यावरून सर्व पक्षीय बैठक बोलाविली होती, मात्र बारामतीमधून एक फोन आला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला, पाठीमागून सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे का काम का करताय ? असा सवाल उपस्थित करीत, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जेष्ट नेते शरद पवारांवर घणाघाती आरोप केला.
बारामतीत राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या वतीने जन सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भुजबळ बोलत होते यावेळी ‘जन सन्मान’ जाहीर सभेला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार सुनेत्रा पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे भुजबळ म्हणाले की सध्या आरक्षणाचा प्रश्न राज्यभर गातोय, काही लोकं आपापसात लढाया – मारामाऱ्या. दंगे होण्यासाठी काही प्रयत्न करीत आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे, मात्र इतर आरक्षित समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी हीच आमची मागणी आहे. आरक्षणाचे भांडण मिटविण्यासाठी, आरक्षणाच्या मुद्यावरून सह्याद्रीवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, यामध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांनी यावं आणि मार्गदर्शन करावं, आरक्षणाचा जो मुद्दा गाजतोय त्यावरून होणारे वाद शांत कसा होईल, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या बैठकीला विरोधी पक्षातील नेत्यांनी येणं क्रमप्राप्त होतं, म्हणून मी स्वतः विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं तुम्ही सुद्धा या, बैठकीला येण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की शरद पवार यांना सुद्धा बोलवा, कारण आतापर्यंत शरद पवारांनी आरक्षण दिलं. त्यांचे आम्ही आभार मानले, मात्र आता निर्माण झालेल्या आरक्षणाच्या परिस्थिती दरम्यान राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी बैठकीला यायला हवं होतं, मात्र, सगळे येणार होते. संध्याकाळी पाच वाजता बारामतीमधून एक फोन आला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी जेष्ट नेते शरद पवार यांच्यावर केला.
तर तुमचा राग आमच्यावर असेल , तुमचा राग अजितदादांवर असेल, तुमचा राग छगन भुजबळांवर असेल पण या ओबीसी समाजाने तुमचे काय घोडं मारलाय ? का तुम्ही येत नाही ? पाठीमागून काही तरी सल्ले द्यायचे आणि महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग करायचे, ओबीसी व मराठा समाजाला वाऱ्यावर सोडायचे हे अजिबात योग्य नाही कारण या राज्यातले सगळे समाज तुमचे आणि आमचे आहेत, त्यांचे प्रश्न सोडविण्याची सुबुद्धी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी प्रार्थना भुजबळांनी जाहीर बोलताना केली. तर ज्यांनी सुनेत्रा वहिनींना मतदान केले त्यांचे पण आर्ज भारा आणि ज्यांनी सुप्रिया ताईंना मतदान केले त्यांचेही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरा असे आवाहन भुजबळ यांनी केले.
छगन भुजबळ यांनी आरक्षणा बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली
बारामतीतल्या सभे वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या मंचावरून होते, ते भाषण करण्यासाठी उठले. त्यावेळी उपस्थित मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा कार्यक्रमाच्या ठिकाणी घुमल्या. त्यावेळी मंचावर उपस्थित भुजबळ यांनी मला माझी बाजु मांडू द्या अशी विनंती केली त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र दरम्यान भुजबळांनीच आपलं भाषण आवरतं घेतलं. आणि आपल्या जागेवर जावून बसले, त्यानंतर घोषणाबाजी थांबली. मात्र तेवढ्या वेळातही भुजबळांनी आपली बाजू मांडली, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे ही माझी भूमिका आहे, पण ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांच्या आरक्षणा अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असे मत व्यक्त केले.
