October 24, 2025

खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

IMG-20240705-WA0200

बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुळे यांच्या वाढदिवस दिनानिमित्त बॅनर व इतर खर्च टाळून गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना येथील मिशन हायस्कूल बारामती येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

सदरचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गाटाचे पुणे जिल्हा सरचिटणीस जयकुमार काळे, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गाटाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अस्लम तांबोळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता,

कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे, तालुकाध्यक्ष ॲड.एस.एन. जगताप, शहराध्यक्ष ॲड. संदीप गुजर, बारामती शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, तालुका महिला अध्यक्ष वनिता बनकर, तालुका युवती अध्यक्षा प्रियंका शेंडकर, शहर युवती अध्यक्षा प्रियंका खारतोडे, सोशल मिडीया पुणे जिल्हा अध्यक्ष पैगंबर शेख, सोशल मिडीया शहर अध्यक्ष शुभम गाडेकर, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष जाकिर शेख, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सचिन लडकत, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष राजेश जाधव, VJNT सेलचे शहर अध्यक्ष संदेश जाधव, शहर उपाध्यक्ष संतोष काकडे, शहर उपाध्यक्षा ॲड.अमृत नेटके, युवक उपाध्यक्ष मोहसिन पठाण, युवक शहर उपाध्यक्ष.प्रतिक अक्कर,  अल्पसंख्यांक शहरचे कार्याध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष इकबाल शेख, अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष नेल्सन थोरात, अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष विवेक साळवी, अल्पसंख्यांक शहर सह कार्याध्यक्ष शशिकांत वागळे, सामाजिक कार्यकर्ते अतुल खैरे, इंद्रभान लव्हे, अण्णा पाटील, समीर पठाण, पत्रकार संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्याकार्म यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहर व तालुका  पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बहुसंख्य उपस्थित राहून सहकार्य केले

You may have missed

error: Content is protected !!