डॉ.ऋतुराज काळे यांच्या वतीने वारकरी यांना अन्नदान
बारामती : मा. जेष्ट नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.ऋतुराज काळे यांच्या वतीने बारामतीत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी यांना अन्नदान करण्यात आले.
खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते येथील भिगवण चौक येथे पाच हजार वारकरी यांना वाडापाव वाटप करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच काळे यांच्या घरी दोन दिंड्यांमध्ये सहभागी वारकरी यांच्यासाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
वारकरी यांची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष माऊलीची सेवा करणे होय आणि अन्न दानासारखे दुसरे मोठे दान नाही त्यासाठीच मी अनेक वर्षांपासून अन्न दान करीत असल्याचे डॉ. ऋतुराज काळे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवव्रत काळे, डॉ.पूर्णानंद काळे, रणजीत काळे, सुशांत काळे, यश काळे, सत्यजित मोहिते, अंकुश जाधव, तैनुर शेख, सुरज देवकाते, अॅड. अमर गाढवे, निरंजन नेवसे, रणजीत लिंबरकर, राजभाऊ झोंड, अमोल लोखंडे, संदीप झोंड, मंगल पवार, अक्षय पवार, बापू बागल, ऋषीकेश देवकाते, सतीश बनकर, रमेश आटोळे, वरुणराज आटोळे, कैयस शेख,चिंटू जाधव, निखिल जाधव,बन्सीलाल मुथा, नरेंद्र कपूर, अप्पा वाघ, समाधान दिंडकर, संजय शितोळे, कृष्णा शिंदे, बाळासाहेब खरात यांनी सहकार्य केले.
