पत्नीला पळवून नेले म्हणून अल्पवयीन भावाचे अपहरण
बारामती : पत्नीला पळवून नेल्याचा राग मनात धरून ज्या युवकाने पत्नीला पळवून नेले, त्याच्या अल्पवयीन भावाचे अपहरण केल्याची घटना बारामतीत उघडकीस आली आहे, या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी प्रताप जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर हाकीकात 6 जुलै रोजी अल्पवयीन मुलाचे अपहरण केले त्या प्रकरणी 8 जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात अपहरनाची फिर्याद दाखल झाली होती त्यानंतर संशयिताला पोलिसांनी दोन पथके तयार करून तातडीने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढून सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून अटक केली आणि शिथापीने पोलिसांनी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाची 18 तासात सुटका केली. अपहरण करणाराने जो पर्यंत माझ्या पत्नीला आणून सोडत नाही तो पर्यंत तुझ्या भावाला सोडणार नाही अशी धमकी दिली होती.
जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शहर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके, व कुलदीप संकपाळ, फौजदार युवराज घोडके, पोलिस हवालदार यशवंत पवार, मोहम्मद अंजर मोमीन, अंकुश दळवी यांनी कामगिरी पार पडली.
