October 24, 2025

तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत पार पडले मेंढ्याचे गोल रिंगण.

IMG-20240707-WA0076

बारामती :  “ज्ञानोबा माउली..तुकाराम नामाचा गजर,…. डोई तुळस ठेवली, भाळी चंदनाचा टिळा, माळ गळ्यात घातली केला विठूचा कल्लोळ,  दिंडी पंढरी चालली”..  असे अभंग म्हणत तुकोबारायांची पालखी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मेंढ्याच्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली. टाळ-मृदंगाचा गजर, माउलीं – तुकोबांच्या नामघोषात रिंगणाच्या दिशेने खिळलेल्या वैष्णवांच्या नजरा अशा भक्तिमय वातावरण आणि भाविकांच्या उत्स्फूर्त जल्लोषात काटेवाडीतील मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरातील भाविकांनी काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीचे जंगी स्वागत केल्यानंतर गावातील मैदानावर पालखी नेण्यात आली. या वेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केले, आणि सुरू झाला डोळ्यांचे पारणे फेडणारा मेंढ्याचा रिंगण सोहळा. तत्पूर्वी काटेवाडी येथे जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखीचा प्रवेश होताच परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत करण्यात आले,  पूर्वी मेढ्यांचे रोग दुर करण्यासाठी धनगर समाजातील एका मेंढपाळाने तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर मेढ्याचे रोग दूर होण्यासाठी प्रार्थना केली होती. मेढ्यांचे रोग दुर झाल्यापासून संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेढ्याचे रिंगण अनेक वर्षापासून घालण्याची परंपरा आहे. हे रिंगण मानाचे असून चोपदाराचा इशारा मिळताच मेढ्या, तसेच वारकर्यांनी पताका हातात घेऊन एकापाठोपाठ एक रिंगणात धावले. बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात तुकोबांच्या पालखीला दुपारच्या विश्रांतीनंतर मेंढ्यांचे रिंगण झाले. या रिंगण सोहळ्या नंतर तुकोबांची पालखी इंदापूर तालुक्यातील सणसर गावी मुक्कामासाठी मार्गस्त झाली.

You may have missed

error: Content is protected !!