आता लाडकी बहीण योजनेचा घरबसल्या करा अर्ज
राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी एक नवी योजना ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली असून. यासाठी राज्य सरकारच्या वतीने ‘नारीशक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे घरबसल्या मोबाईलवरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
महिलांचा आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे हा या योजनाचा हेतू असून या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
मोबाईलवरून अर्ज असा करा ?
तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. मात्र घर बसल्या मोबाईलवरूनही तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी ‘नारीशक्ती दूत’ ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करायचा आहे. फेटा घातलेल्या महिलेचा प्रतिकात्मक चेहरा असलेला फोटो आहे तो ॲप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा. ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हांला तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंद करायची आहे. त्यानंतर तुमची माहिती भरून प्रोफाईल तयार करायची आहे. त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरीमध्ये आहे, याची माहिती भरावी लागणार आहे. पुढे मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर माहिती भरायची आहे. अर्जदाराचा फोटो जोडायचा आहे. त्यानंतर लागणारी कागदपत्र जोडून तुम्ही तुमचा अर्ज भरून पूर्ण होतो. त्यानंतर तुमचा अर्ज भरून झाल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येतो.
काय आहे पात्रता
- महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित तसेच निराधार महिला याचा लाभ घेऊ शकतात.
- योजनेसाठी वयाची अट २१ ते ६५ वर्ष आहे.
- लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
(१) ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज. (२) आधार कार्ड. (३) राज्यातील जन्म दाखला. (४) बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. (५) पासपोर्ट आकाराचा फोटो. (६) रेशनकार्ड. (८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
महिलांनी हा अर्ज भरुन अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका/ सेतु सुविधा केंद्र येथे जमा करायचा आहे. तर तालुका पातळीवरील नगर परिषद / नगर पंचायत / तसेच ग्रामपंचायत येथे हा अर्ज जमा करायचा आहे.
( या ॲपवर सध्या उत्पन्नाचा दाखला व रहिवाशी दाखला विचारला जात आहे मात्र काही दिवसांनी तो ॲप अपडेट होणार आहे जेव्हा ॲप अपडेट होईल तेव्हाच अर्ज करा. )
