पालखी दरम्यान डीजे लावल्यास पोलीस कारवाई करणार
बारामती : बारामती शहरात दिनांक 06 जुलै व 07 जुलै रोजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आगमन होणार आहे. पालखी आगमन दरम्यान बारामती शहरात पालखी मार्गामध्ये कोणीही डीजे लावू नये तसेच त्यादरम्यान डीजे लावल्यास डीजे लावणारे संबंधित डीजे मालक यांचेवर गुन्हे दाखल करून डीजे जप्त करण्याची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.
तसेच पालखी मार्गात कोणीही अनाधिकृत कमानी उभारू नयेत, तसेच परवानगी घेतलेल्या कमानी स्टेज यामुळे जर पालखी मार्गात पालखीला अडथळा निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विशेषता देशमुख चौकामध्ये अनेक स्टेज मंडप उभारून तेथे स्पीकर लावले जातात मागील वर्षी अशा डीजे व स्पीकरमुळे पालखी विश्वस्थ यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशा ठिकाणीही स्पीकर लावताना परवानगी घेऊनच स्पीकर लावावे. तसेच पालखी आगमनाच्या वेळी संबंधित स्पीकर शक्यतो बंद ठेवण्यात यावेत. असेही आवाहन करण्यात आले आहे
