निर्यातदारांना लागणारे सर्टिफिकेट ऑफ ओरिजीनची सुविधा बारामतीत सुरू

बारामती : बारामती विभागाचे चेअरमन शरद सुर्यवंशी यांनी निर्यातदारांना लागणारे सर्टिफिकेट ऑफ ओरिजीन हे प्रमाणपत्र बारामतीच्या विभागीय कार्यालयामध्ये देण्यात यावे यासाठी सातत्याने चेंबर्सकडे पाठपुरावा केला होता याची दखल घेवून ललित गांधी यांनी सदरील सुविधा १ जुलै २०२४ पासून बारामती विभागीय कार्यालयातून सुरू करीत असल्याचे जाहीर केले
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री व अँग्रिकल्चर या संस्थेची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असून, संस्थचे नुकतेच बारामतीमध्ये विभागीय कार्यालय सुरू केले आहे, महाराष्ट्र चेंबर्सच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी महाराष्ट्र चेंबर्सचे नुतन अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगांवे, उपाध्यक्ष दिलीप गुप्ता तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून निवड झालेले शरद सुर्यवंशी, चंद्रकांत ठक्कर, डॉ. विजयकुमार मालापुरे, जगदीश पंजाबी, महेश ओसवाल यांचाही याप्रसंगी बारामती विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदरील प्रमाणपत्र हे चेंबरचे विभागीय कार्यालय ‘हॉटेल सुर्या’ पहिला मजला, भिगवण रोड, बारामती येथून देण्यात येईल. तरी बारामती विभागातील निर्यातदार उद्योजकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बारामती विभागाचे चेअरमन शरद सुर्यवंशी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत बारामती विभागाचे व्हा. चेअरमन शिवाजीराव निंबाळकर यांनी केले. आभार बारामती विभागाचे व्हा. चेअरमन सुशिलकुमार सोमाणी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी भारत फोर्जचे प्लान्ट हेड संजय आगरवाल, सदाशिव पाटील, अॅड. पी. टी. गांधी, मनोज तुपे, सुरेश पकराळे, विलास आडके, साईनाथ चौधर, भारत जाधव, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.