खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकाभिमुख आणि नागरिकांच्या गरजेचे बारामती शहरांमध्ये रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते
रक्तदान शिबिर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय बारामती येथे आयोजित करण्यात आले होते, सदरच्या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिराचे उद्घाटन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, यांच्या हस्ते तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष संदीप गुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, क्रीडा सेलचे अध्यक्ष रवींद्र कराळे, प्रसिद्धीप्रमुख सुरज मालुसरे, बारामती तालुका ओबीसी अध्यक्ष, चंद्रकांत हिवरकर, बारामती तालुका युवक कार्याध्यक्ष अक्षय शिंदे, पप्पू गोफणे, व्ही जे एन टी तालुका अध्यक्ष बाबू सावंत, सचिन पलंगे, अडॅ शशिकांत पाबळकर, किरण चौधर, वैभव शिरहट्टी, बापूराव गायकवाड, महेश जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्त संकलन येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड सेंटर बारामती यांनी केले, उपस्थित आयोजक आणि रक्तदात्यांचे आभार ब्लड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.के,सिसोदिया यांनी मानले.
