October 24, 2025

डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

IMG-20240701-WA0104

बारामती : डॉक्टर्स डेच्या निमित्ताने बारामतीच्या डॉक्टरांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर कौतुकास्पद असल्याचे मत तसेच या पुढील काळात वैद्यकीयमहाविध्यालय महाविद्यालय बारामती व इंडियन मेडिकल असोशिएशन बारामतीच्या यांच्या संयुक्तरीत्या परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्याचा मनोदय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सी.बी. म्हस्के यांनी बोलताना व्यक्तकेला.

डॉक्टर्स डे निमित्त येथील इंडियन मेडिकल असोशिएशन बारामतीच्या वतीने येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड सेंटर बारामती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सी.बी. म्हस्के यांच्या हस्ते तसेच तहसीलदार गणेश शिंदे,  आय. एम. ए.  महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. एम.आर. दोशी, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांनी आओ गाव चाले या इंडियन मेडिकल असोशिएशन बारामतीच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे व्यक्त करीत खुद्द डॉक्टर्स एकत्र येत रक्तदान करीत असल्याचे पाहून उपक्रमाचे कौतुक केले.

इंडियन मेडिकल असोशिएशन बारामतीच्या अध्यक्षा डॉ. साधना कोल्हाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,तर सचिव डॉ. निकिता मेहता यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विक्रम धोपाडे,डॉ. गोकुळ काळे, डॉ. संजय पुरंदरे,डॉ.राजेश कोकरे,डॉ. अमरसिह पवार,डॉ. सौरभ मुथा, डॉ.चंद्रशेखर धुमाळ, डॉ राहुल संत, डॉ.रेवती संत, डॉ.शरयू दुर्गुडे, डॉ. अपर्णा काटे, डॉ. सुप्रिया गदादे, तसेच ब्लड सेंटरचे डॉ. डी.एन.धवडे आदी सन्माननीय डॉक्टर्स उपस्थित होते.यावेळी इंडियन मेडिकल असोशिएशन बारामतीच्या सर्व डॉक्टर्स यांनी लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड सेंटर बारामती यांच्या उपस्थित कर्मचारी आणि संस्थेच्या अविरत सेवेचे कौतुक करीत आभार मानले.

You may have missed

error: Content is protected !!