December 9, 2025

बारामती शहरात पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा

Picsart_24-06-27_14-09-26-025

बारामती : नीरा डावा कालव्‍याचे  आवर्तन बंद झाले  असून उपलब्‍ध पाणीसाठा मर्यादीत असल्‍याने पर्यायाने पाणी पुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

गुरुवार दि.27 जुन  रोजी  संपूर्ण बारामती शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवठा होईल व शुक्रवार दि. 28 जुन रोजी पाणीपुरवठा होणार नाही.  अशाप्रकारे  निरा डावा कालव्‍याचे पुढील आवर्तन मिळेपर्यत  एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाण्याचा जपून वापर करावा व नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!