माई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने वृक्षारोपण

बारामती : येथील इरिगेशन कॉलनी या ठिकाणी माई फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने श्रमदानातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये 151 देशी झाडे लावण्यात आली.
माई फाउंडेशन ट्रस्ट ही गेले अनेक वर्षापासून गोरगरीब लोकांसाठी, गरिबांच्या मुलांचे शिक्षणासाठी मदत करणे, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना मदत करत असते तसेच आर्थिक दृष्ट्या हातबल असलेल्या कुटुंबांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत देखील करत आहेत, तसेच दरवर्षी रक्तदान शिबिर देखील आयोजित केली जातात.
माई फाउंडेशन श्रमदानातून वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप लोंढे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला, यावेळी माई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. वैभव काळे, तसेच फाउंडेशनचे देणगीदार सभासद व मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. वैभव काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.