बारामती वाहतूक शाखेने राबवली अनोखी ‘नंबरप्लेट मोहीम’

बारामती : तुटलेल्या, पुसट झालेल्या, फॅन्सी व विना क्रमांकाच्या वाहणांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई एक-दोन नव्हे तर चार वेळा केली तरीही काही महाभाग आपल्या वाहनांवर क्रमांक टाकत नाही. अशा वाहनांवर चक्क सवलतीच्या दरात थेट नंबर प्लेट लावण्याचा अनोखा उपक्रम बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी राबवला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या अनोख्या फंड्यामुळे तब्बल ६४ वाहनांवर आता नंबरप्लेट लागल्या आहेत. जिथे अशा विना नंबरच्या गाड्या कारवाईत सापडतील त्यांच्यावर नंबर प्लेट टाकण्यासाठी व बसवून देण्यासाठी दि.२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत ही मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेत संबंधित वाहने बाजूला घेऊन नंबरप्लेट बनविणाऱ्याना उपलब्ध करून वाहनांवर नंबरप्लेट बसवण्यात आल्या. सध्या बारामती वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरक्षिततेबाबत चांगलीच जनजागृती केली आहे. अनेक टवाळखोर तरुणांकडून वाहणावर फॅन्सी नंबर लावण्यात येतात, वाहणांच्या क्रमांकात छेडछाड करून फायनान्स किंवा अन्य प्रकारातुन वाचण्यासाठी खोटे नंबर टाकले जातात, काही चालकांकडे वाहन चालक परवाना नसतो, काही वाहणांना मुद्दाम नंबर टाकले जात नाहीत तर काही वाहने गुन्ह्यासाठी वापरलेली असतात अशावेळी वाहणांचे नंबर ब्लँक केले जातात. त्यामुळे अवघड गुन्ह्याचे तपास लावताना पोलिसांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो.मात्र दंड न करता विना क्रमांकाच्या वाहनांवर अशाप्रकारे केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस अंमलदार
प्रशांत चव्हाण, अशोक झगडे, प्रदीप काळे, सुधाकर जाधव, सचिन वाघ, योगेश कांबळे, रुपाली जमदाडे, स्वाती काजळे, सीमा साबळे, सीमा घुले, माया निगडे, वनिता कदम तसेच बऱ्हाणपूर उपमुख्यालय येथील महिला पोलिस अंमलदार जागृती मचींदर, दिपाली वडवकर, अर्शीन शेख, स्मिता गायकवाड, शीतल कोकरे, मयुरी शिरसाट, गोदावरी केंद्रे, शुभांगी रुपणवर, मनीषा इंगळे, शीतल नन्नवरे, सारिका शितोळे, रेणुका साळवे यांनी केली.