October 24, 2025

लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून भाविकांसाठी मोफत धार्मिक सहल…

IMG-20240624-WA0091
बारामती: अध्यात्मिक मार्गातून सामाजिक सेवा केल्याने आनंद व समाधान मिळते व सामान्य व्यक्तींना काशी अयोध्याचे दर्शन घडविनयाचे काम केल्याने  पुण्य मिळते २००६ पासून अविरत सेवा चालू असल्याचे प्रतिपादन लोकविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष व शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील यांनी प्रतिपादन केले.
आर्थिक दृष्ट्या दुबल, पैसे आहेत काही तंत्रिक कारणास्तव  जाता येत नाही, वेळ आहे पण पैसे नाही ,अपंग, विकलांग आशा सर्वांसाठी लोकविकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून मोफत  काशी अयोध्या धार्मिक सहली चे आयोजन करण्यात आले होते त्याचे प्रस्थान सोमवार (दि.२४) जून २०२४ रोजी तांदुळवाडी येथे मान्यवरांच्या उपस्तीत करण्यात आले होते या प्रसंगी  जय पाटील बोलत होते.
 या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन अधीक्षक हनुमंत पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव,युवक मा.नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, सुभाष सोमाणी, माळेगाव साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, मा. नगरसेवक अतुल बालगुडे,संतोष गलिंदे, मा. उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ व दीपक मलगुंडे, प्रा अजिनाथ चौधर,दिनेश जगताप, विशाल जाधव, पार्थ गालिंदे,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती जिल्हा सर संघ चालक दीपक पेशवे, संघचालक बारामती शहर विवेक पांडकर, सेवा भारतीचे अध्यक्ष संदीप देशपांडे, उद्योजक मंगेश मासाळ,भाजपा तालुका अध्यक्ष जगदीश कोळेकर, सिद्धनाथ भोकरे, संतोष सातव, मंगेश गिरमे, नवनाथ चौधर, परवेज सय्यद, दीपक पेशवे, व इतर मान्यवर,भाविक,नागरिक उपस्तीत होते.
मोफत काशी यात्रा चा लाभ २७८० भाविकांनी आता पर्यंत घेतला असून या वर्षी ६१० भाविकांना काशी व अयोध्या दर्शन होणार आहे प्रवास,जेवण,राहणे  या सेवा दिल्याने परमेश्वर ची सेवा केल्याची अनुभवती येत असून सामाजिक,पर्यावरण व विविध सेवेसाठी लोकविकास प्रतिष्ठान कटिबद्ध असल्याचे  शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.
बारामती मधील पहिली काशी यात्रा संपन्न करून दातृत्व दाखवले व अत्याधुनिक शतकात काशी व अयोध्या यात्रा संपन्न करून धार्मिक, अध्यात्मिक वैज्ञानिक सांगड लोकविकास प्रतिष्ठान ने घालून आदर्श निर्माण केल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले. तर यावेळी सचिन सातव, सुभाष सोमाणी व विवेक पांडकर , प्रा अजिनाथ चौधर आदींनी मनोगते व्यक्त केली  व लोकविकास प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात भाविकांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!