October 24, 2025

नगरपालिका कर्मचाऱ्यांचा एल्गार, कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

images

बारामती : नगरपरिषद कर्मचारी यांच्या अनेक मागण्या शासकीय आणि प्रशासकीय स्थरावर प्रलंबित असल्याने त्या कारणाने बारामती नगरपालिकेचे कर्माचारी आंदोलनाच्या पावित्र्यात असून येत्या २६ जुन रोजी कर्मचारी यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कर्मचारी यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत. 1) मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने सफाई कर्मचारी यांच्यासाठी वारसाहक्क लागू करणे बाबत ठोस भूमिका मांडून वारसाहक्क धोरणात तात्काळ निर्णय घ्यावा. 2) नगरपरिषदेतील दि.1 जानेवारी 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 3) राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचारी यांच्या प्रमाणे नगरपरिषद कर्मचारी यांना 10,20,30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा तसेच ज्यांना 12 व 14 वर्षाची कालबद्ध पदोन्नती लागू केली नाही त्यांना करण्यासाठी शासनस्थरावर निर्णय व्हावा. 4) सन 1993 पूर्वीच्या रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचारी यांना सेवेत कायम करावे व त्यांना वारसा हक्क लागू करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय व्हावा 5) कंत्राटी कर्मचारी यांना कायम करावे व समान कामांना समान वेतन द्यावे. 6) सन 2005 नंतर कायम झालेल्या मात्र सेवेत असताना मयत कर्मचारी यांच्या कुटुंबांना निवृत्ती वेतन लागु करावे व त्याबाबत नगरविकास विभाग यांचे मान्यता असताना देखील लागु केला जात नाही याबाबत तातडीने कार्यवाही करणे बाबत. 7) राज्यातील गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेली अनुकंपाधारकांची पदे तात्काळ भरावी. 8) संवर्ग कर्मचारी यांची पदे तात्काळ भरावी तसेच पूर्वीच्या संवर्ग कर्मचारी यांना पदोन्नती तत्काळ द्यावी. 9) कर्मचारी यांची प्रलंबित असणारी वैद्यकीय प्रतिपूर्ती तात्काळ द्यावी. 10) नगरपालिकेच्या मालकीच्या रहिवासी कर्मचारी सदनिकेत राहणाऱ्या कर्मचारी यांचे घरभाडे आकारणी माफक करावी. या मागण्या नगरपालिकेचे कर्माचारी यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत, मागण्या मान्य न केल्यास राज्य कर्मचारी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठींबा द्यावा लागेल असा इशारा कर्मचारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

You may have missed

error: Content is protected !!