सोशल मीडियात आक्षेपाहार्य…? मेसेज केल्याने गुन्हा दाखल.
बारामती : व्हाटसअॅप वर अक्षेपाहार्य मेसेज व्हायरल केल्याने बारामतीत शहर पोलिस ठाण्यात अजीज जाफर सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशांत लोणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सविस्तर हाकीकात अशी की व्हाटसअॅप या समाज माध्यमात आक्षेपाहार्य मेसेज केल्याने संबंधिताला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता बेदरकपणे गाडी चालवून मानवी जीवितास धोका निर्माण करणे तसेच समुदायाच्या आधारावर चिंताजनक, बातम्या, मजकुर प्रसारित करणे या कारणावरून बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्यथा गुन्हा दाखल.
जात, धर्म, समुदाय, गटाच्या धार्मिक भावना दुखावतील किंवा समाजात तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवू नये अगर त्या आशयाचा समाजमाध्यमात मेसेज निष्काळजी पणाने शेअर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.
