बारामती शहर पोलिस ठाण्यात 44 जणांवर गुन्हा दाखल
बारामती : व्हाटसअॅप वर धार्मिक उल्लेख असलेल्या पोस्ट शेअर केल्याचा राग मनात धरून 44 जणांच्या जमावाने मारहाण व गाडीचे तसेच गाडीतील वस्तूंचे नुकसान केल्याच्या कारणावरून शहर पोलिस ठाण्यात 44 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अजीज जाफर सय्यद यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सविस्तर हकीकत अशी की काल दि. 20 जुन रोजी व्हाटसअॅप वर आलेला मेसेज आला होता तो मेसेज धार्मिक पथदर्शी होईल या कारणाने असल्याने ती पोस्ट पर्सनलला घेत राजकीय पक्षाच्या ग्रुपवर शेअर झाली झालेल्या प्रकार लक्षात येताच फिर्यादीने सदरच्या ग्रुपवर पोस्ट चुकून पडल्याचे नमूद केले, मात्र त्यानंतर पुन्हा त्याच रात्री प्रशांत लोणकर याचा फोन आला व त्याने तुम्ही काय पोस्ट टाकली आहे अशी विचारणा करीत दमदाटी करून शिवीगाळ केली व जमाव जमवला आहे तु काठे आहेस असे म्हणाला व जीवे मारण्याची धमकी दिली व त्यानंतर जमाव जमवून आणि दहशत माजवून, कट रचून साधारण 44 जणांच्या जमावाने फिर्यादीला पोलिसांच्या समक्ष मारहाण केली या प्रकरणी प्रशांत लोणकर संग्राम राऊत, अमित शिवरकर, शंभो गदादे, सौरभ ढवाण, कमलेश लोणकर, पिंटु कुलकर्णी, सुरज भोसले, संकेत काशीदकर, निलेश जाधव, अक्षय घाडगे, तानाजी जाधव, शिवाजी जाधव व त्यांचे इतर 25 ते 30 सहकारी यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
झाला प्रकार मॉब लिचींग नाही का ?
झाला प्रकार धार्मिक कारणावरून झाला असून, त्यात चक्क जमाव जमवून, कट रचून जीवघेणा हल्ला केलेल्या आरोपींना पोलिसांनी पाठीशी घातल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे, तसेच बारामतीत धार्मिक तणाव निर्माण करणारांवर पोलिसांचा वाचक राहीला नाही अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.
