इंडियन मेडिकल असोसिएशन बारामतीच्या वतीने आओ गाव चले उपक्रमाचा प्रारंभ
बारामती : इंडियन मेडिकल असोसिएशन बारामती या शाखेच्या अध्यक्षा डॉ साधना कोलटकर यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यातील सोनकसवाडी हे गाव दत्तक घेण्यात आले आहे त्यानुसार उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात केली करण्यात आली.
इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या संपूर्ण भारत देशात 1702 शाखा विखुरल्या आहेत सुमारे पंधरा वर्षांपूर्वी या संस्थेने आओ गाव चले या उपक्रमाचा प्रारंभ केला या अंतर्गत आत्ता पर्यंत देशभरातील 1400 गावे दत्तक घेण्यात आली आहेत यंदाच्या वर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन बारामती या शाखेच्या वतीने तालुक्यातील सोनकस वाडी हे गाव दत्तक घेण्यात आले आहे त्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब आदी देशी वृक्षांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन मुख्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, आओ गाव चले उपक्रमाचे चेअरमन डॉ. बिपिन पटेल, डॉ. अनिल पावणेकर, डॉ. व्ही. के. मोगा हे राष्ट्रीय पदाधिकारी खास दिल्ली, अहमदनगर, मुंबई येथून आले होते. या कार्यक्रमासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ अशोक तांबे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षा डॉ. साधना कोल्हाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सचिव डॉ. निकिता मेहता यांनी आभार मानले सूत्रसंचालन डॉ. वर्षा सिधये यांनी व प्रियंका आटोळे यांनी केले, डॉ. विशाल मेहता, डॉ. सुनील पवार, डॉ. बापू भोई डॉ. सौरभ मुथा, डॉ. सुयश शहा, डॉ. अमर पवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. सोनकसवाडी गावाच्या सरपंच राणी कोकरे आणि सर्व ग्रामस्थांनी सर्व उपस्थित डॉक्टरांचे स्वागत केले व ग्रामस्थांनी झाडांची काळजी घेण्याची हमी दिली आओ गाव चले उपक्रमाअंतर्गत आरोग्य सेवे बरोबरच स्वच्छता, शालेय तपासणी, महिलांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, गावात पुस्तके वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अनेक प्रकारचे शिबिरे आयोजित करण्याचे ठरले आहे सोनकसवाडी ग्रामस्थांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचे व आयोजकांचे आभार मानले तसेच ग्रामस्थ व गावाचे पोलिस पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
