मोदींकी गॅरंटी चली नही, त्यांना माहिती नाही बारामतीची गॅरंटी काय आहे .. शरद पवार
बारामती : आज देशाची ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांची खेड्या-पाड्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण यांच्याबद्दलची वृत्ती स्वच्छ नाही, अनेकदा माझा आणि त्यांचा संघर्ष होतो, तर यावेळी निवडणुकीत त्यांनी सांगितले की मोदींकी गॅरंटी है…मात्र या वेळी मोदींकी गॅरंटी चालली नाही कारण त्यांना माहिती नाही बारामतीची गॅरंटी काय असते, यावेळी लोकांनी ती गॅरंटी खाली नेली अशा शब्दात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जेष्ट नेते खा. शरद पवार यांनी बारामतीत येथे बोलताना टीका केली
पुढे पवार म्हणाले की, केंद्र सरकारचे धोरण सातत्यावर आधारित नव्हतं, तुम्ही चुकीचा सल्ला त्यांना दिला, तर देशातले 70% लोकं जे शेतकरी कष्टकरी आहेत, मात्र त्या शेतीच्या धंद्यातल्या लोकांच्यासाठी असलेली आपली नीती आणि धोरण यात सातत्य ठेवत नाही, त्याची जगात किंमत केली जात नाही,
पूर्वी सबंध तालुक्यात एक अभियंता होता आजच्या घडीला शिक्षणाची दारे आपण उघडल्याने, शिक्षण संस्था काढल्याने घराघरात अभियंता आहे मात्र त्यांना नोकऱ्या नाहीत, याचा अर्थ असा आहे की सत्ता मिळाल्यानंतर जशी शेती महत्वाची आहे तसाच उद्योग महत्वाचा आहे, आणि त्या उद्योगामध्ये अधिक हातांना काम मिळेल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे मात्र दुर्दैवाने मोदी सरकार योग्य निर्णय घेत नाही, म्हणून संघर्ष आहे आमचं काय दोघांचे भांडण नाही मोदींनी काय माझा बांध फोडला नाही, त्यामुळे मला त्यांच्याशी भांडण करण्याचे काही कारण नाही, मात्र मोदींचे धोरण चुकीचे आहे, संबंध चांगले आहेत तेच बारामतीला आल्यावर म्हणाले होते की शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो, ते काय खर नव्हत पण त्यांनी सांगितले त्यामुळे मला आता भीती वाटते कारण माझ्या बोटाने असे होत असेल याची अश्या शब्दात मोदींना पवारांनी चिमटा घेतला.
एक चमत्कार तुम्ही करायचा आणि एक चमत्कार मी करणार
यावेळी झालेल्या निवडणुकीत आमच्या आसपास पाच सहा लोकं होती त्यात तालुक्यातला एकही पुढारी नव्हता,कुठे गेलेते कुणास ठाऊक ? एकदम सगळे भूमिगत झाले, मी त्याकाळात चौकशी करायचो की आमुक आमुक होते का ? मात्र उत्तर यायचे की पूर्वी जे आसपास असायचे त्यातले कुणीच नव्हते, मग होते कोण तर सगळी नवखी तरुण मुले, खेडो-पाड्यातील गरीब मुलं, या सगळ्यांनी न बोलता आपले काम चोख केले, समोरच्यांना कळलेच नाही की हे कसं झालं जेव्हा निकाल लागला तेव्हा कळले तेव्हा हा चमत्कार कसा काय झाला, ? आणि कुणी केला ? याचा अर्थ एकाच आहे की तुमच्याकडे चमत्कार करण्याची ताकत आहे, आता हा चमत्कार उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला करायचा आणि प्रश्न सोडवायचे एक चमत्कार तुम्ही करायचा आणि एक चमत्कार मी करणार असेही पवारांनी व्यक्त केले.
