February 11, 2026

खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची खासदार सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

shataeie-cejs-wwkwlz8a_2024031186959
बारामती :  शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधीत दुकांदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुळे या सध्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन याबाबत आपली मांडली. हे शेतकरी जेंव्हा रासायनिक खते आणण्यासाठी दुकानात जातात तेंव्हा त्यांना खतासोबत कीटकनाशक विकत घेण्याची सक्ती केली जाते. ते घेतले तरच खते देणार असे सांगितले जाते, ही बाब शेतकऱ्यांनी सुळे यांच्या लक्षात आणून दिली.
हा प्रकार लक्षात येताच खासदार सुळे यांनी लागलीच ट्विट करत, ‘हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारची जबरदस्ती कुणालाही करता येत नाही. तरीही त्यांची अशी पिळवणूक होत असेल तर ते चुकीचे आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून अशा दुकानांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत’, अशी मागणी केली आहे.

दुकानदारांच्या तक्रारी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

खते, बियाणे व किटकनाशके आदी निविष्ठांच्या खरेदीप्रसंगी दुकानदारांकडून जादा दराने विक्री, खरेदी पावती न देणे, एका निविष्ठेसोबत दुसरी निविष्ठा खरेदीसाठी सक्ती करणे, निविष्ठा उपलब्ध असतानाही विक्री न करणे, मुदतबाह्य  निविष्ठा विक्री करणे आदी स्वरुपाच्या तक्रारी कळविण्यासाठी जिल्हास्तरावर ९१५८४७९३०६ हा व्हॉटसअॅप क्रमांक सुरू करण्यात आला असुन, शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या अडचणी आल्यास त्यांनी दिलेल्या व्हॉटसअॅप क्रमांकावर आपल्याकडील ठोस पुराव्यासह तक्रार करावी त्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!