सत्तेचा गैर वापर करणारांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ ……शरद पवार
बारामती : काही लोकं सत्तेचा गैर वापर करीत आहेत, लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत, अश्यांना त्यांची जागा त्यांना दाखविण्यासाठी काम करावे लागेल, त्यासाठी येणाऱ्या निवडणुका आहेत. लोकसभा झाली, झालेल्या लोकसभा निवडनुकीत तुम्ही चांगले काम केले आहे. आता काहीही झाले तरी महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे, असा एल्गार जेष्ट नेते शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केला. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे जेष्ट नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला त्यावेळी पवार बोलत होते.
पुढे पवार म्हाणाले की, महाराष्ट्र हातात घेतल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, नोकरदार वर्ग, बेरोजगारी, माहागाई कमी करण्यासाठी त्या सत्तेचा वापर करायचा आहे. नागरीकांचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठी आपण सर्व एकत्र राहू मी तुम्हांला खात्री देतो की, तुमच्या सर्वांच्या एकीच्या शक्तीपुढे कोणाचे काही चालणार नाही, आणि तुमचे प्रश्न सोडविण्याची खात्री आम्हा लोकांकडून घेतली जाईल असेही आश्वासन उपस्थितांना दिले तर न बोलता लोकसभेला ज्यांनी – ज्यांनी तुतारीला मतदान करून चोख काम केले त्यांचे पवारांनी आभार मानले.
तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक वेगळा विचार दाखविण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रात त्यांचा झंजावती दौरा आखण्यात आला, देशाचे पंतप्रधान सोळा ठिकाणी गेले, मात्र माझं भाग्य ते जेथे-जेथे गेले तेथे- तेथे त्यांनी माझं नाव घेतले, काय त्यांना वाटत होत माहित नाही मात्र ते माझं नाव घेत असे आणि टीका करीत असे, निवडणुका झाल्या त्याचे निकाल आले, 48 पैकी आम्ही 31 जिंकल्या याचा अर्थ आसा आहे की प्रधानमंत्री असो नाहीतर राज्याचा मुख्यमंत्री असो सत्तेचा गैरवापर नाहीतर फोन करून मतदारांना केलेली दमदाटी असो त्याची नोंद मतदारांनी घेतली नाही आणि त्यांनी त्यांचे मत योग्य ठिकाणी दिले
राज्यात शेतकरी कष्टकरी , नागरिक यांचे अनेक प्रश्न आहेत मात्र राज्यात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी ते प्रश्न सोडविले नाहीत त्यासाठी आम्हांला त्याच्यात लक्ष घालावे लागेल असा इसारा पवारांनी सत्ताधारी राज्य सरकारला दिला.
बारामतीच्या सहकारी संचालकांना पावारंनी दिला इशारा.
संस्था चालाकांना विनंती आहे की, बाबानो इतकी वर्षे आम्हां लोकांचे आशीर्वाद तुम्ही घेतले, तुम्ही शेतकरी सभासद या सर्वांचे भले कराल म्हणून आमचा तुम्हांला पाठींबा होता, मात्र तुम्हांला भलं करण्याची आठवण नसेल तर तुमच्यासाठी काय करायचे याचा निकाल आम्हांला घ्यावा लागेल, अशा शब्दात बारामतीच्या संचालकांचा जेष्ट नेते शरद पवार यांनी समाचार घेत इशारा दिला.
