October 24, 2025

काहीही झाले तरी राज्याचे सरकार हातात घ्यायचे आहे …शरद पवार यांचा निर्धार

PTI03_14_2024_000059B

बारामती : आम्ही ठरविले आहे काहीही झाले तरी महाराष्ट्र राज्याचे सरकार हातात घ्यायचे आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकी नंतर सरकार आमचेच असेल त्यानंतर पाणी, कांदा आणि दुधाच्या दराचा प्रश्न कसा सुटत ते बघू, जसे लोकसभेच्या निवडणुकीत काम केले तसेच तुम्ही विधानसभेसाठी काम करा अशा शब्दात जेष्ट नेते शरद पवार यांनी शेतकरी वर्गाला आश्वास्त करीत निर्धार बोलताना व्यक्त केला.

जेष्ट नेते शरद पवार हे बारामती तालुक्याच्या दुष्काळी जनसंवाद दौऱ्यावर आहेत त्या दरम्यान तालुक्यातील सुपे येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना व्यक्त केले.पुढे बोलताना पवार म्हणाले की, येताना कारखेल, देऊळगाव या गावाहून आलो दरम्यान येत असताना अनेक निवेदने पाण्याच्या समस्येची आहेत, काहींच्या मते जानाई शिरसाई योजनेचे तलाव बंद पाईप लाईन टाकून भरावेत तर काहींच्या मते तसे करू नये अश्या आशयाची निवेदने आहेत मात्र ही योजना मंजूर करण्याचा अधिकार त्याकाळी माझ्याकडेच होता  काही ठिकाणी पोट चार्या झाल्या नाहीत तर काही ठिकाणी योजनेचा फायदाच झाला नाही त्यामुळे तो भाग वंचित राहिला तर वेळेवर आवर्तन मिळत नाही सर्व कामच अपूर्ण झाले आहे. त्याची पूर्तता करावी लागणार आहे,. राज्याचे राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा आणखी कोणी असो या सर्वांचे लक्ष शेतकऱ्यांकडे नाही असेही पवार यांनी व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!