मतदारांनी मोदींना जामिनावर आणले
बारामती : निवडणुका येतात जातात मात्र देशात स्थिरता राहिली पाहिजे, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, दहावर्षे सत्तेत राहिलेल्यांना यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जमिनीवर आणले असल्याची टीका जेष्ट नेते शरद पवार यांनी केंद्रीय सरकारवर केली.
बारामतीत जेष्ट नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पवार बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, युगेंद्र पवार, माजी विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते, मनसेचे प्रदेश पदाधिकारी सुधीर पाटसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एस.एन.जगताप, युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे तसेच शहरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते पुढे पवार म्हणाले की राम मंदिराच्या नावाने मते मागितले मात्र त्याचा आयोध्यात पराभवाला सामोरे जावे लागले, आवघ्या २४० जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले चंद्राबाबू व नितेश कुमार यांचा पाठींबा घ्यावा लागला त्यांच्यासोबत झालेल्या वाटाघाटी करून सरकार स्थापन केले मात्र त्या वाटाघाटी विसरून चालणार नाही अशी देखील बोचरी टीका पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.
दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो, तेव्हा पावसाची सुरुवात होते
शरद पवार म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे. दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो, तेव्हा पावसाची सुरुवात होते असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगले वर्ष आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादन दोन नंबरला गेले आहे. राज्य सरकारने शहाणपण दाखवले नाही महाराष्ट्रामध्ये यंदा साखरेचे उत्पादन जास्त झालं आहे. मात्र केंद्र सरकारने साखरेवर निर्बंध आणले. त्यांना मी सांगितले होते निर्बंध आणू नका. तर मला सांगण्यात आले की, निवडणूक होई पर्यत आम्ही तुमचे ऐकणार नाही, असंही शरद पवार यांनी बोलताना सांगितलं.
मोदींची मदत घेणार.
बारामती लोकसभा मतदार संघात भविष्यात मोठ्या प्रमाणत उद्योग आणणार असून त्यासाठी मी पंतप्रधान मोदी यांची मदत घेणार असल्याचे देखील पावर यांनी व्यक्त केले.
