December 15, 2025

बारामतीचा दादा बदलायचाय ? शरद पवारांना कार्यकर्त्यांनी घातले साकडे

IMG_20240611_182854

बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी थेट जेष्ट नेते शरद पवार यांची भेट घेत युगेंद्र पवार यांना आगामी विधानसभेला उमेदवारी द्यावी असे साकडे घातले आहे त्यामुळे पुन्हा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर जेष्ट नेते शरद पवार हे बारामती मतदार संघाच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी तीन दिवस दौऱ्यावर आहेत दरम्यान शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या जनता दरबारात हजेरी लावली त्यावेळी कार्यकर्त्यांनी जेष्ट नेते शरद पवार यांच्याकडे बारामतीचा दादा बदलायचा आहे, विधानसभेला आपण युगेंद्र दादांना संधी द्यावी बारामतीला शांत स्वभावाचा दादा हवा आहे तर सध्याच्या असलेल्या दादांपुढे काही चालत नाही तसेच येणाऱ्या विधान सभेला युगेंद्र पावर यांना संधी द्यावी आम्ही सर्व जन काम करू अश्या शब्दात कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना साकडे घातले. त्यावर शरद पवार यांनी निर्णय लवकरच होईल तुम्ही काही काळ संयम ठेवण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मिळाली.  .

 युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत सध्या युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान या पवारांच्या शैक्षणिक संस्थेवर खजिनदार आहेत तसेच इतर अनेक संस्थांवर ते काम करीत आहेत.

भविष्यात काका विरुध्द पुतण्या असा सामना होण्याची शक्यता ?

झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना पहायला मिळाला, त्यानंतर आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना होवू शकतो त्याच दृष्टीने कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे साकडे घातले आहे.

error: Content is protected !!