October 24, 2025

पुढचं पाऊल ‘ चा प्रकाशन सोहळा संपन्न 

IMG-20240609-WA0132 (1)
बारामती : अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा विद्यार्थी, उद्योजक व उद्योग, व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत, तसेच परदेशी शिक्षण घेऊ इच्छित आहेत व विविध शिष्यवृत्ती योजना, रोजगार निर्मिती कार्यक्रम, विविध प्रमाणपत्र कशी मिळवायची,  आशा सर्वांसाठी  केंद्र व राज्य शासनाच्या  सर्व योजना, विवाह समारंभ,  इलक्ट्रोनिक, पर्यटन,  लाईफ स्टाईल, घर, बंगला आदी  सर्व माहिती कमी वेळेत, एकाच पुस्तकात उपलब्ध होण्यासाठी ‘पुढच पाऊल’ मराठ्यासाठी दिनदर्शिका हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
याचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.०८ जून रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तालुका शाखेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या वेळी अध्यक्ष संभाजी माने  व सागर खलाटे, गणेश काळे, हनुमंत भापकर, सुदर्शन निचळ, कुमार चव्हाण, विलास शेळके, महेश निगडे, अभिजीत जगताप, अनिल सावळेपाटील, अर्चना सातव, ज्योती जाधव, ऍड. सुप्रिया बर्गे , मनीषा शिंदे, ऍड. अश्विनी शिंदे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
मराठा समाज्यातील विध्यार्थी आणि  व्यवसाय करू इच्छित असणाऱ्या तरुण तरुणीसाठी सदर पुस्तक अतिशय उपयुक्त असून घर बसल्या सर्व माहिती एकाच पुस्तकात आहे या मुळे वेळ व पैसा वाचणार आहे. तरी हे पुस्तक खरेदी करू इच्छुकांनी संभाजी माने 9822449306, कुमार चव्हाण 7066069009 अर्चना सातव 7875121989 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती शाखेच्या वतीने देण्यात आली.

You may have missed

error: Content is protected !!