१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शारदानगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन

बारामती : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यासंबंधाने १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शारदानगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ऍग्रीकलचरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर येथे संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य निलेश नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली व नियोजन व विकास विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे वतीने या कार्यशाळेचे नियोजन केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संपूर्ण माहिती नव्याने आलेली शैक्षणिक पद्धती, झालेले बदल, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, मल्टिपल एन्ट्री, मल्टिपल एक्झीट, एकसमान श्रेयांक/ क्रेडिट पद्धत, 3+1 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम, पाच वर्षांचा एकात्मिक बहुविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर्स), पुढील वर्गातील प्रवेश कसे घ्यावेत ? कोणती विद्याशाखा निवडावी ? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना कसे फायदेशीर ठरणार आहे ? इ स्वरुपाची माहिती १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना व त्यांच्या पालकांना देण्यासाठी “NEP स्कूल कनेक्ट अभियान” अंतर्गत गुरूवार दि. १३ जून २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर येथे कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क नसून प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सदस्य व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व मान्यवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी बारामती तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी व पालकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे अवाहन प्राचार्य प्रा डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी केले आहे.
या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कला व वाणिज्य विद्याशाखा प्रमुख डॉ. मोहन निंबाळकर यांच्याशी 9766444469 या क्रमांकावर तसेच विज्ञान व गृहविज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ. परिमिता जाधव यांच्याशी 9096191104 या क्रमांकावर आणि कार्यशाळा समन्वयक राजकुमार देशमुख यांच्याशी 9960259067 या क्रमांकावर संपर्क साधवा.