गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह एजंटला अटक
बारामती : गर्भलिंग निदान करणे कायद्याने बंदी असताना देखील बारामती तालुक्यातील माळेगाव येथे डॉक्टरसह त्याच्या एजंटला एका महिलेची गर्भनिदान निधन चाचणी केल्या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे
शुक्रवार दि 7 जून रोजी सायंकाळी ही कारवाई पोलिसांनी केली तर डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे ( वय 52 वर्ष रा. लक्ष्मीनगर, फलटण ) व त्याचा साथीदार एजंट नितीन बाळासाहेब घुले ( वय 34 रा. ढेकळवाडी, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात बारामती येथील सिल्वर जुबली रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
माळेगाव येथील गोफणेवस्ती नाशिक एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डॉ. शिंदे व त्यांचा एजंट साथीदार घुले यांनी एका महिलेची गर्भ निदान चाचणी केली घटनेच्या ठिकाणी ते सोनोग्राफी मशीनसह पोलिसांना आढळून आले आहेत, त्यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दोन्ही आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असुन, या संदर्भाने पोलिस अधिक तपास करीत आहेत तसेच अश्या आणखी टोळ्या बारामती आणि परिसरात कार्यरत आहेत का ? असतील तर ज्यांना माहित आहेत अश्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उप विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी केले आहे.
