बारामती शहरात चेन स्नॅचिंग करणारे सक्रीय, …..बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती : बारामती शहरात चेन स्नॅचिंग करणारे सक्रीय झाले असून या संदर्भाने बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की बारामती शहरात एक महिला आपल्या मुलींच्या शाळेची खरीदी करण्यासाठी आली असताना शहरातील गुणवडी चौक येथे पायी चालत असताना भर दिवसा दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात चोरांनी तिच्या गळ्यातील अंदाजे 80 हजार रुपयांचा दोन तोळे सोन्याचा गंठन गळ्यातून हिसकावून नेल्याची पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान संबंधित महिलेने मदतीचे अवाहन केल्या नंतर देखील कोणी मदतीला आले नाही आणि अज्ञात चोरटे गंठन घेऊन दुचाकीवरून पसार झाल्याचे देखील फिर्यादित नमूद केलं आहे.
