बारामतीत एकच चर्चा…..38 ला, एकच भारी
बारामती : बारामती शहर परिसरात एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा जल्लोष सुरु असताना बारामतीत 38 नगरसेवकाला एकच माजी नगरसेवक सत्यव्रत काळे भारी तर योग्य नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम या चर्चेला उधाण आले आहे.
बारामतीमध्ये राष्ट्रवादीच पक्षाचे दोन गट पडल्यानंतर पवार कुटुंबात दोन गट पडले शहरात एका बाजूला पक्ष, चिन्ह आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची भली मोठी फळी असे असताना दुसऱ्या बाजूला शरद पवार गटात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची कमतरता होती सुरुवातीला तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष हे दोघेच होते कार्यकर्ते नव्हते किंवा खुद्द बारामतीत पक्ष विस्तार देखील नव्हता मात्र जेव्हा माजी नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी जेष्ट नेते यांच्यावरची निष्ठा कायम ठेवत शरद पवार गटात प्रवेश केला आणि युवक अध्यक्ष पदाची धुरा आपल्या हाती घेतली तेव्हा बारामतीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची साखळी विस्तारली, माजी नगरसेवक सत्यव्रत काळे यांच्या रूपाने शरद पवार गटाला एक प्रकारे संजीवनी मिळाली आणि पक्षाच्या कामाला गती मिळाली आज जेव्हा विजयाचा गुलाल उधळला जाऊ लागला तेव्हा सत्यव्रत काळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर एका बाजूला 38 नगरसेवक आणि एका बाजूला एक नगरसेवक भारी पडला अशी चर्चा नागरिकांमध्ये चर्चेला होती. कर्तव्य निष्ठा, पक्ष विचार निष्ठा याचे आदर्श उदाहरण म्हणजेच सत्यव्रत काळे अशी देखील चर्चा बारामतीत होती.
बारामतीत राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर उभ्या बारामतीत फुट पडली, जशी पवार कुटुंबात फुट पडली तशीच बारामतीच्या घराघरात फुट पडली, पिता एका गटाकडे तर मुलगा दुसऱ्या गटाकडे हेच काय तर सख्खे भाऊ देखील गटा-गटात विभागले गेले, एका घरात दोन वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार, वेगवेगळे झेंडे हातात घेत प्रचार सुरु झाला, मात्र निकाल लागल्यानंतर मन मनातून एकीकडून एक शब्द आस आला की, माझ्या वाघाची झलक, सगळ्यात अलग अश्या शब्दात सत्यव्रत काळे यांचे कौतुक करीत उर्जा दिली, त्यामुळे बारामतीत मित्र परिवाराकडून देखील कौतुक केले जात आहे.
