December 15, 2025

ड्रोनच्या आफवांवर विश्वास ठेवू नका… पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे आवाहन

Picsart_24-06-02_17-55-27-914

बारामती : बारामती आणि परिसरात रात्रीचे ड्रोन फिरत असून त्याबाबत अनेकांकडून शंका निर्माण केल्या जात आहेत मात्र ते ड्रोन नसुन बारामती येथील ट्रेनिंग विमाने आहेत, ते रात्रीचा सराव करीत आहेत तेव्हा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बारामती शहर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे

अनेक ठिकाणाहून  आकाशात ड्रोन उडत असल्याबाबत फोन येत आहेत. यामध्ये बहुतांश ट्रैनिंग विमान आहेत, जी रात्रीचा सराव करत आहेत. याबाबत आम्ही विमान कंपनीची चर्चा करत आहोत आणि त्यानंतर सविस्तर माहिती देणार आहोत.  नागरिकांनी विनाकारण अफवा पसरवू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वासही ठेवू नये. ड्रोन द्वारे कुठेही चोरी किंवा सर्वे केल्याचा कोणताही प्रकार अद्याप घडलेचा किंवा तसा प्रकार निदर्शनास आलेला नाही. नागरिकांनी भिऊ नये याबाबत शंका असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही याबाबत खात्री करत आहोत असेही आवाहन बारामती शहर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.

error: Content is protected !!