दुर्गवेड्या बारामतीकरांनी सर केले अत्यंत आव्हानात्मक ‘K2S’

बारामती : रेंज ट्रेक या प्रकारामधील अत्यंत आव्हानात्मक असे K2S म्हणजेच ‘कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक’ दुर्गवेडे बारामतीकर संस्थेच्या ३५ जणांच्या ग्रुपने यशस्वीरीत्या सर केले.
नाईट ट्रेक म्हणजे रात्रभर पायी दुर्गभ्रमंती अशी या ट्रेकची ख्याती आहे. कात्रज जुना बोगदा ते सिंहगड दुर्गाचा पायथा असा तब्बल १६ किलोमीटरचा प्रवास रात्री चालून पार करणे असे या ट्रेकचे स्वरूप आहे. १६ किलोमीटरचा हा ट्रेक करताना वाटेत चार डोंगर आणि बारा छोट्यामोठ्या टेकड्या पार कराव्या लागतात. हे सर करणाऱ्या ३५ जणांच्या ग्रुपमध्ये शालेय वयातील मुले-मुली, महिला-पुरुष तसेच जेष्ठ नागरिकांचाही समावेश होता.
‘प्रत्येक महिन्यात एक दुर्गभ्रमंती’ या उपक्रमामध्ये एकही महिना खंड पडू न देता सलग १२ वी दुर्गभ्रमंती K2S ही होती अशी माहिती ‘दुर्गवेडे बारामतीकरचे संस्थापक अध्यक्ष सुहास देशमुख यांनी दिली.