जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त बारामतीत जनजागृती

बारामती : 31 मे हा दिवस जगभरात जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात तंबाखू विरोधात जनजागृती करण्यासाठी हा दिवस निश्चित केला आहे.
तंबाखूचे आरोग्यावर आणि पर्यावरणावर असंख्य दुष्परिणाम होतात हे आपण जाणतोच, या विषयाला अनेक पैलू आहेत. जागतिक आरोग्य संघटना दर वर्षी वेगळ्या पैलूवर लक्ष केंद्रित
करते. मागील वर्षी ‘अन्य पिकवा तंबाखू नको’ असे घोषवाक्य होते. ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण’ हे घोषवाक्य आहे. तंबाखू उद्योग आपल्या फायद्यासाठी लहान मुलांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनाची एक नवीन लाटच निर्माण होऊ पहात आहे. जगभरात १३-१५ वर्ष वयोगटातील ३७ दशलक्ष मुलं या व्यसनाच्या विळख्यात
सापडली आहेत. हा आकडा चिंताजनक आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन एक मोहीम राबवत आहे. या मोहिमेमध्ये व्याख्याने व कार्यशाळांचे नियोजन करने, जनजागृती फेरी काढणे,सार्वजनिक ठिकाणी माहिती पत्रके लावणे अशा विविध
कार्यक्रमांचा समावेश आहे. याला अनुसरून इंडियन मेडिकल असोसिएशनची बारामती शाखा वरील कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे असे. इंडियन मेडिकल असोसिएशन, बारामतीच्या अध्यक्षा डॉ साधना कोल्हटकर, यांनी माहिती दिली, कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सचिव डॉ. निकिता मेहता, कोशाध्यक्ष डॉ. प्रियांका आटोळे, डॉ. वर्षा सिधये, डॉ दिपिका कोकणे यांनी सहकार्य केले.