December 7, 2025

मुलांवर लक्ष्य ठेवण्याचा, बिल्डरांना अजित पवारांचा सल्ला.

images

बारामती : सर्वांनी आपली मुले व्यवस्थित वागतात का ? रात्री कोठे जात आहेत ? याकडे लक्ष दिले पाहिजे नाहीतर केलेल्या लाडाची फार जबरदस्त किंमत मोजावी लागते, कायदा कोणाच्या बापाचा नाही,  मग तो गरीबाच्या घराचा मुलगा असो वा श्रीमंताच्या घरचा मुलगा असो कायदा कोणी मोडता कामा नये,  हिट अंॅड रणसारख्या घटनांमुळे समाजात नैराश्य पाहायला मिळते आणि समाजमाध्यमात त्याचे पडसाद पडतात मात्र असे प्रकार घडू नये या मताचा मी आहे आणि त्याची आपण सार्वजन मिळून काळजी घेऊ असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना दिला.

बारामतीत बिल्डर असोशिएशनचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पवार बोलत होते, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील हिट अंॅड रणचा दाखला देत मुलांवर लक्ष्य ठेवण्याचा बिल्डरांना सल्ला दिला.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, बारामतीचा विकास करीत असताना लोक प्रतिनिधी म्हणून मी बारामतीत दर्जेदार कामे करून,  बारामतीच्या विकासात भर घालण्याचा प्रयत्न करतोय मात्र बारामतीच्या नागरिकांनी देखील केलेल्या विकास कामांचे संवर्धन, जतन केले पाहिजे,  शेवटी मी तरी करून – करून किती करणार आहे,  त्यालाही मर्यादा आहेत,  मात्र जबाबदार नागरिक म्हणून बारामतीच्या नागरिकांनी देखील केलेल्या कामांचे संवर्धन करणे ही जबाबदारी नागरिकांची आहे,  असेही मत  उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!