बारामातीतल्या धोकादायक बांधकाम पाडण्याच्या नगरपालिकेच्या सुचना
बारामती : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमा अन्वये बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व रहिवासी मिळकत धारकांना या जाहीर सूचनाद्वारे कळविणेत येते की, चालू पावसाळी मोसमामध्ये संभाव्य अतिवृष्टी, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी ज्या मिळकती. इमारती धोकादायक झाल्या आहेत अथवा त्याचा काही भाग धोकादायक झाला आहे. अशा इमारतीमध्ये किंवा मिळकतीमध्ये
कोणीही वास्तव्य करू नये. तसेच अशा इमारतींच्या व मिळकतींच्या संबंधित मालकांनी आपल्या कुटुंबियांची तसेच शेजारच्या रहिवाशां यांची संभाव्य जीवित व वित्त हानी होऊ नये या दृष्टीने धोकादायक इमारतीचा धोकादायक भाग तातडीने उतरवून घेऊन धोका नष्ट करावा.
याबाबत अशा नगरपरिषदा संबंधितांनी यापूर्वी कळविणेत आले होते, आपसातील वाद व इतर कारणांमुळे अनेक मिळकत धारकांनी अशा धोकादायक इमारती बांधकामे काढून घेतलेली नसल्याचे. सदरची बाब अयोग्य व धोकादायक असून अशी धोकादायक बांधकामे पडून हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांनी अशा धोकादायक इमारती तात्काळ रिकामी करून अशी बांधकामे तात्काळ पाडून उतरवून घ्यावीत अन्यथा अशा धोकादायक इमारतीमध्ये जर कोणी वास्तव्य केले तसेच त्यामुळे आपणास व इतरांस कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी झाल्यास त्यास संबंधित घरमालक व भोगवटादार हे संपूर्णतः जबाबदार राहतील. नगरपरिषद जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
