लोकसभा निवडणुकीत बारामतीत पैसे वाटल्या कारणाने गुन्हा दाखल

बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीत बारामतीत पैसे वाटल्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या सूचनेवरून पंचायत समितीचे कर्मचारी केशव तुकाराम जोरी यांनी शहर पोलिस ठाण्यात व्हिडीओ मधील अज्ञात इसमा विरोधात फिर्याद दिली आहे.
सविस्तर हाकीकात आशिकी की आमदार रोहित पवार यांनी बारामती येथील साठेनगर मधील अंगणवाडी परिसरात लोकसभा निवडणुक प्रक्रीये दरम्यान पैसे वाटप केल्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल केला होता त्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या सूचनेवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ ट्विटरवर शेअर करीत, अजित दादा घ्या इडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाने पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडीओ, तर आता व्हिडीओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही, असं म्हणु नका, आणि इतर लोकं तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत असंही म्हणू नका, अशी कमेंट केली आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना ट्विटरवर टॅग केले आहे.