बारामतीत सावकारांनी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बारामतीत नैतिकतेचे अध:पतन,
बारामती : घरभाडे मागितल्यावरून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग सावकारांनी केला असून या प्रकरणी एकाच घरातील चौघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, बाल लैगिक अत्याचार (पोक्सो ) , विनयभंग, फसवणुक तसेच बेकायदा सावकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, बारामती येथील आरोपी नामे 1) निलेश सुनिल बोऱ्हाडे 2) मंगेश सुनिल बोऱ्हाडे 3) अभिजित बोऱ्हाडे 4) निलेश बोऱ्हाडे यांची पत्नी सर्व रा. ( बारामती ) यांनी घरभाडे मागण्यासाठी अल्पवयीन पीडिता गेली असता निलेशबोऱ्हाडे याने अल्पवयीन पीडितेला कसले घर भाडे मागते असे म्हणाला त्यावेळी मंगेश बोऱ्हाडे याने तु घरामध्ये ये तुला देतो घर भाडे असे म्हणत असताना अभिजित बोऱ्हाडे याने पिडीतेच्या जवळ येवुन उजवे हाताला पकडुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पीडीतेला घरात ओढुन तुला घर भाडे देतो असे म्हणुन घरात ओढु लागला त्यावेळी निलेश बोऱ्हाडे, मंगेश बोऱ्हाडे, अभिजित बोऱ्हाडे व निलेश बोऱ्हाडे यांची पत्नी यांनी अल्पवयीन पिडीतेलाला जातीवाचक बोलुन जातीवाचक शिवीगाळ करून निलेश बोऱ्हाडे यांने तीच्या अंगावरून लज्जा उपन्न होईल अशा पद्धतीने हात फिरवुन व मंगेश बोऱ्हाडे यांनी गळ्यात हात टाकुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावर पीडिता त्यांच्या तावडीतुन सुटुन आईकडे जावुन आईला घडला प्रकार सांगितला असता आई, पिडीतेच्या आईने घडल्या प्रकारचा जाब विचारला असता तु कोणाला काही सांगितले तर तुझे तारण ठेवलेले सोने व व सोन्याचे पैसे देणार नाही असा दम दिला. अशी फिर्याद अल्पवयीन पीडीतेने शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
या कारणावरून वर नमूद चौघांविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक , बाल लैंगिक अत्याचार ( पोक्सो ) , विनयभंग तसेच बेकायदा सावकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत.
