October 24, 2025

दादांच्या नॉट रिचेबलचे, साहेबांनी दिलं उत्तर, साहेब नेमके काय म्हणाले सविस्तर वाचा…..

Picsart_24-05-16_19-00-21-157

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. दादा पुन्हा नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि प्रसिद्धी माध्यमात रंगू लागल्या होत्या  कारण त्याचे कारण देखील तसेच होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती होती. तसेच कल्याण, नाशिक, आणि मुंबईच्या रोड शो मध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे न दिसल्यामुळे राजकीय आणि प्रसिद्धी माध्यमात एक ना अनेक चर्चा सुरु झाल्या,  दादा नेमके गेले कुठे ? दादा नाराज झालेत का ? …..

यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, अजित दादा नॉटरिचेबलही नाहीत आणि नाराजही नाहीत. त्यांना घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते पुन्हा प्रचारात सहभागी होतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

दरम्यान यावर जेष्ट नेते शरद पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यावर बोलताना जेष्ट नेते शरद पवार म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे, त्यामुळे दादांच्या नॉट रिचेबल चर्चेला अखेर साहेबांनी पूर्ण विराम देत चर्चेचा विषय एका वाक्यात संपविला.

You may have missed

error: Content is protected !!