भाजप पुन्हा सत्तेत आल्यास सारे विरोधक जेलमध्ये जाणार – अरविंद केजरीवाल

दिल्ली : भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देशातील सर्व विरोधक जेलमध्ये जाणार आस दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजुर केला.तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. जामीन दिल्यानंतर त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत जोरदार टीका केली.
पुढे, अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपाने एका वर्षात आम आदमी पक्षाचे चार मोठे नेते तुरुंगात टाकले. पंतप्रधान मोदींनी आम आदमी पक्षाला पूर्णपणे संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र मला तुरुंगात टाकून मोदी म्हणतात की, ते देशाला मुक्त करायचे आहे मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत. मात्र त्यांनी स्वतःच्या पक्षातच देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांना, चोरांना सोबत घेतले आहे. ज्यांच्यावर मोदी यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला, त्यांनाच सोबत घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं, मंत्री पदे दिली आणि त्यांच्या सर्व चौकश्या थांबविल्या आणि म्हणतात मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. मी मोजींना सांगेन की जर तुम्हांला भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढायची असेल तर केजरीवालांकडून तुम्ही शिकावे असे अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले.
या सभेदरम्यान केजरीवाल यांनी आणखी एक गंभीर आरोप केला ते म्हाणाले, मला तुरुंगात टाकून त्यांनी देशातील सर्व देशवासियांना आणि विरोधकांना संदेश दिला. जर आम्ही अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकू शकत असलो, तर सत्ता आल्यानंतर देशातील कोणत्याही नेत्याला तुरुंगात टाकू शकतो. मोदी सरकारने सर्वात भयानक मिशन सुरु केले आहे, त्याचे नाव आहे एक देश एक नेता, देशातील सर्वच नेत्यांना मोदिजी संपविणार आहेत, हे मिशन दोन टप्प्यात असणार आहे, जेवढे विरोधक आहेत त्यांना जेलमध्ये पाठविणार आणि जेवढे भाजपाचे नेते आहेत त्यांना राजकारणातून संपविणार, जर भाजपाची सत्ता आली तर ममता बॅनर्जी, स्टॅलिन, उद्धव ठाकरे आणि देशातील इतर विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील, असा आरोप केजरीवाल यांनी आरोप करीत पुढे म्हणाले भाजपाने स्वतःच्या नेत्यांनाही संपविले आहे, लालकृष्ण आडवाणी, मुर्लीमनोहर जोशी, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, डॉ. रमण सिंग यांच्यासारखे कैक नेते त्यांनी संपविले आहेत आता कोणाचा नंबर आहे तर तो योगी आदित्यनाथ यांचा नंबर आहे, विजय मिळू द्या, दोन महिन्यात ते उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांनाही संपविणार, असा दावा देखील अरविंद केजरीवाल यांनी केला, हीच हुकुमशाही आहे. आपल्या देशाचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा हुकुमशाही या देशात आली तेव्हा नागरिकांनी त्या हुकुमशाहांचा सत्ता पालट केला आहे असा घणाघाती आरोप देखील केला.
तर मी न्यायालायाचे धन्यवाद करतो की, त्यांनी मला 21 दिवासांचा वेळ दिला, जी मला वेळ मिळाली आहे, त्या वेळेत मी रात्रंदिवस एक करून या हुकुमशाहीच्या विरोधात देशभर प्रचार करणार असा निर्धार केजरीवाल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.