वैद्यकीय प्रवेशासाठी पंधरा लाखांची फसवणूक
बारामती : वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने बारामतीतील एका अभियंत्याला 15 लाखांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की बारामतीतील स्थापत्य अभियंता राजेश शिंदे यांच्या मुलीला बी.ए.एम. एस. साठी आरोमा आयुर्वेदिक मेडिकल, कॉलेज, हरिद्वार, उत्तराखंड येथे प्रवेश घ्यायचा होता त्याकरता एजंट संजय शंकरलाल शहा (रा. नांदेड सिटी, पुणे ) व गप्रीतम शंकरराव तिपायले ( रा. ग्रेव्हीला मगरपट्टा सिटी, हडपसर) या दोघांविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची शिंदे फिर्याद दिली आहे. सदरचे एजंट शिंदे यांना भेटले व प्रवेशासाठी संबंधित एजंटयांनी 16 लाख रुपयांची मागणी केली, त्यानुसार आरोमा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी शिंदे यांनी सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत पूर्ण रक्कम दिली. मात्र यातील फक्त एक लाख रुपये सदरचे एजंट शहा व तीपायले या दोघांनी महाविद्यालयात भरली आणि उरलेली रक्कम 15 लाख स्वतःसाठी वापरली जेव्हा शिंदे यांनी रकमेची विचारपूस केली असता पैसे देण्यास नकार दिला शिवाय त्यांना दमदाटी केली त्यामुळे शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
