October 24, 2025

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये ४६ टक्के मतदान 

IMG-20240507-WA0152 (1)

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या झालेल्या मतदानात बारामती लोकसभा मतदार संघामध्ये एकूण ४६ टक्के मतदान  झाले आहे मतदार संघात साधारण 23 लाख 72 हजार 668 मतदार आहेत पैकी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ४६ टक्के मतदारांनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

आज सुरू आज सुरू झालेल्या मतदानासाठी पवार कुटुंबातील सदस्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह पत्नी प्रतिभा पवार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार सुप्रिया सुळे त्यांचे पती सदानंद सुळे आणि कन्य सोबत होती सुळे यांनी बारामती येथील रिमांड होम मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानानंतर पवार सुळे कुटुंबीयांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या गावी काटेवाडी येथे पत्नी आणि पक्षाच्या उमेदवार सुनेत्र पवार, आई आशाताई पवार यांच्यासह मतदान केले. आणि पिंपळी येथे आ.रोहित पवार यांनी आई सुनंदा पवार, वडील राजेंद्र पवार, आणि पत्नी यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला

उन्हाच्या झळांमुळे मतदान कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र मतदारांचा उन्हाची तीव्रता असताना देखील दुपारी तीन वाजले नंतर प्रतिसाद पहायला मिळाला. निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रांवर सावलीसाठी टाकण्यात आलेले मंडप, वैद्यकीय सुविधा आणि ओआरएस कीट या सुविधा देण्यात आल्याने मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, खडकवासला आहे एकूण सहा विधानसभा मतदार संघ आहेत तालुकानिहाय मतदानाचे आकडे सायंकाळी पाच वाजेपर्यंतचे पुढील प्रमाणे

१) बारामती विधानसभा मतदार संघामध्ये 54.75 टक्के मतदान झाले. २) इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये 50 टक्के मतदान झाले. ३) पुरंदर विधानसभा मतदार संघामध्ये  41 टक्के मतदान झाले आहे. ४) भोर विधानसभा         मतदार संघात 48 टक्के मतदान झाले. ५) दौंड विधानसभा मतदार संघामध्ये 43 टक्के मतदाना झाले. ६) खडकवासला विधानसभा मतदार संघात 40 टक्के मतदान

सकाळ पासूनच मतदान बुथवर मादाराणी मतदान करण्यास सुरुवात केली मात्र बऱ्याच ठिकाणी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदान चिट्ठीवर मतदान केंद्र आणि केंद्राचा पत्ता यामध्ये चुका झाल्याने तसेच काही शहरातील मतदारांचे मतदान ग्रामीण भागात तसेच पतीपत्नीचे वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्रे होती त्यातच भर मानून बहुतांश ठिकाणी मतदारांना एका केंद्रावरून दुसर्या केंद्रावर जाण्यासाठी त्रास झाला तर मतदानाच्या चिठ्या वेळेत न मिळाल्याने कोणत्या केंद्रावर जाऊन मतदान करायचे हाही मतदारांसमोर प्रश्न होता.

 

 

 

 

 

मात्र बारामती लोकसभा मतदार संघात एक गाव आणि बारा भानगडी झाल्यामुळे दिवसभर बारामती मतदार संघ हा राजकीय हाय व्होल्टेज मतदार संघ राहिला.

तांत्रिक बिघाडाच्या चर्चांना उधाण

मॉपपोल दरम्यान ४९ बीयु, 18 सीयु आणि 13 व्हीव्हीपॅट तांत्रिक बिघाडामुळे बदलण्यात आले. तर मतदान सुरू झाल्यानंतर 15 बीयु, 5 सीयु आणि 23 व्हीचीपॅट तांत्रिक बिघाडामुळे बदलण्यात आले त्यामुळे जरी तांत्रिक बिघाड असला तरी मतदारांमध्ये गोंधळ झाला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधान आले होते.

पैसे वाटपाचे व्हीडीओ व्हायरल

मतदार संघात पैसे वाटपाचे समाजमाध्यमात व्हीडीओ व्हायरल झाले आहेत तसेच त्या संदर्भाने आमदार रोहित पवार यांनी देखील पैसे वाटपाचे व्हीडीओ शेअर केले आहेत .

चौकशी करून कारवाई करावी. 

पैसे वाटपा बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसिद्धी माध्यमांनी विचारले असता आमदार रोहित पवार यांचा समाजमाध्यमात चंगला हातखंडा आहे, याबाबत पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने चौकशी करून कारवाई करावी अशी प्रतिक्रिया दिली.

पैसे वाटपामुळे मतदार घराबाहेर पडेना

इतिहासात प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीत पैशांचा बोलबाला झाला. बारामती लोकसभा मतदार संघात मतदानाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी पैसे वाटप झाले त्यामुळे नागरिक पैशाच्या आशेने मतदान करायला घरा बाहेर पडेना तर दुपारी 3 नंतर मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली.

पैसे वाटपाच्या रोशाने तुतारी वाजण्याची शक्यता ?

मतदारांना मताला एक हजारांचा भाव सोडला मिळाले पाचशे रुपये तर ग्रामीण भागात दोन हजार रुपये वाटपाची चर्चा होती त्यामुळे अनेकांनी घड्याळाचे पैसे घेऊन तुतारी वाजविल्याची चर्चा बारामतीत दबक्या आवाजात सुरू होती.

सहकारी बँकांचे पासबुक चा घोळ

लोकसभा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत मात्र बारामतीत मोठा घोळ समोर आला बँकांचे पासबुक ओळखपत्र म्हणून न स्वीकारण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत बारामती बँक व जिल्हा बँकेचे बनावट पासबुक वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप केला होता शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने बँकांचे फोटो पासबुक मतदार ओळखपत्र म्हणून न स्वीकारण्याच्या सूचना दिल्या.

माझी आई माझ्या सोबत..

आज सकाळी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या आईसोबत तसेच उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासोबत मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझी आई ही कुटुंबात सर्वात मोठी आहे आणि ती माझ्या सोबत आहे असे व्यक्त केले.

सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत असतानाच सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थानी गेल्या सकाळी मतदानानंतर सुळे अजित पवारांच्या घरी गेल्या त्यावेळी अजित पवारांची आई यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे सुळे यांनी सांगितले मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील घरी उपस्थित होते त्यामुळे या भेटी मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चंगलीच रंगत आली होती.

आमदार दतात्रय भरणे यांच्या व्हिडीओने वातावरण तापविले.

सकाळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मौजे इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे एका व्यक्तीला चांगलेच धारेवर धरीत शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला त्यामुळे एकूणच दिवसभर वातावरण चांगलेच तापले होते त्यावरून झाला परकार सुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविला त्यावर भरणे यांनी मी होतो म्हणून अनुचित प्रकार घडला नाही अन्यथा वगळा प्रकार घडला असता अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांना दिली.

मतदान प्रक्रिया शांततेत

मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्या बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी बोलताना सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!