राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळेचे आयोजन

बारामती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संदर्भात सर्व अभ्यास मंडळामार्फत वाणिज्य शाखेतील शिक्षकांसाठी, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या वतीने गुरुवार दिनांक 9 मे रोजी शारदानगर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आवश्यकता, यामुळे वाढणारी शैक्षणिक गुणवत्ता व याची यशस्वीरित्या अंमलबजावणी अशा विषयांवर व्याख्यान व चर्चा आयोजित करण्यात आली आहे. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिक्षकांना आपल्या शंकांचे निरसन करता येऊ शकेल. सदर कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. पराग काळकर, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. मिठारे यशोधन, बँकिंग आणि फायनान्स बोर्डाचे चेअरमन डॉ. किशोर निकम, अकाउंटन्सी बोर्डाचे चेअरमन डॉ. मनोहर सानप, बँकिंग बोर्डाचे मेंबर डॉ. अशोक मोजाड असे मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यशाळेचे समन्वयन डॉ.ऐ.आर मुंगी हे करीत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांना उपस्थित राहण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. एस.व्ही. महामुनी यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.