विनोदकुमार गुजर शाळेची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

बारामती : येथील विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर या शाळेने सन 2023-24 या वर्षी देखील आपली 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. येथील सी.आय.एस.सी.ई विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून शाळेच्या विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे.
शाळेचे प्रथम क्रमांक चि. मित स्वप्नील मुथा या 99.40 टक्के, कु. सानिका कमलाकर टेकवडे 99.40 टक्के , तर द्वितीय क्रमांक कु. दिया संदेश शहा हिस 98.80 टक्के, तर तृतीय क्रमांक चि. तीर्थराज सचिन धुमाळ 98.20 टक्के, कु. पियुष प्रमोद पाटसकर 98.20 टक्के आणि रोनोजाय रोहन शहा 98.20 टक्के गुण संपादन केले आहेत.
विध्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्या बद्दल यशस्वी विध्यार्थ्यांचे विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्यध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले.