रोहित पवारांच्या भावनिकतेची अजित पवारांनी उडवली खिल्ली
बारामती : सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या उपस्थितीत आ. रोहित पवार एका क्षणी भावनिक झाले आणि त्यांना बोलताना त्यावेळी अश्रू अनावर झाले हे एकीकडे एका सभेत घडले असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा सुरू होती त्या सभेत अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल करत आ. रोहित पवारांची चक्क खिल्ली उडवली.
उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर सभेत मोबाईल वर करीत बोलताना म्हणाले की आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यात पाणी काढून दाखवलं त्याची ( आ. रोहित पवारांची ) नक्कल करत मी पण दाखवतो ( तोंडावर, डोळ्यावर हात लावत…रडून ) मला मत द्या, …मला मत द्या…अरे काय हे…..हे बघा…असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत, तुम्ही काम दाखवा, खणखणीत नाणं दाखवा, हा रडीचा डाव झाला, हे असलं नाही चालत.
मी आधीच सांगितलं होतं काहीजण असं करणार… तुम्हाला भावनिक करणार..याला ( आ. रोहित पवारांना ) मी जिल्हा परिषदेचे तिकीट दिल, साहेबांनी सांगितलं होतं अजिबात देऊ नको तरी मी त्यांचं ऐकलं नाही मात्र त्याला तिकीट दिल , नंतर मला हडपसरची उमेदवारी द्या असे सांगितले परंतु मी त्यांना कर्जत जामखेडची उमेदवारी दिली, आज तुम्ही माझ्यावर टीका करता तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे पावसाळे मी बघितलेत असेही असे व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी आमदार रोहित पगारांवर नाराजी व्यक्त केली.
नागरिकांचा रोष.
राजकारण राजकारणाच्या जागी असते आणि ते त्याच जागी रहायला पाहिजे, मात्र एक महिनाभर झाले बारामतीकर कौटुंबिक राजकारणाची उणी-धुनी अनुभवीत आहेत, एक कुटुंबाची दोन्ही बाजूकडून उणी-धुनी काढली जात आहेत ते वेग-वेगळ्या मार्गाने बारामतीकर अनुभवीत आहेत मात्र एकूणच या सर्व प्रकारावर नागरिकांच्या वतीने रोष व्यक्त केला जात आहे.
