बारामतीत राजकीय कार्यकर्त्यांची गुंडगिरी
बारामती : बारामतीत राजकीय महिला व पुरुष कार्यार्त्यांनी शहरातील एका वकिलाच्या गाडीला धडक देत वकिलांनाच शिवीगाळ करीत हाणमार केल्याचा प्रकार घडला आहे, या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात अनुचित जाती जमाती प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, आज दि 3 मे रोजी सकाळी 11 वा सुमारास फिर्यादी वकील घरून कोर्टाकडे कामानिमित्ताने त्यांच्या मालकीच्या स्वीफ्ट कार मधून त्यांचे सहकारी वकील यांच्या सोबत जात असताना वकिलांच्या गाडीला माळावरची देवी येथील कॅनालचे पुलावर जळोची बाजूकडून येत असलेल्या इडीगो कारने वकिलांच्या स्विफ्ट कारला उजवे बाजूस पाठीमागे धडक दिली त्याबाबत विचारणा केली असता त्या गाडीतून दोन पुरुष व सहा – सात महिला उतरून बाहेर आल्या व त्यातील एका महिलेने हुज्जत घालत शिवीगाळ केली त्याचे रुपांतर हाणामारीत होवून महिलांनी वकिलांना मारहाण केली तसेच इतर महिलांनी वकिलांच्या गाडीत असलेले पाच हजार रूपये रोख रक्कम व जयंतीचे वेळी ठेवलेले चित्र असलेल्या पटट्या काढून त्या फाडून पायदळी तुडवल्या व पैसे सोबत असलेल्या सहकारी यांच्याकडे दिले आणि आणखी सात-आठ लोकांनी शिव्या देत हाताने लाथाबुक्याने मारहान केली. यावरून साधारण सहा महिला आणि आठ पुरुष यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात अनुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत.
वकील संघटनेचे ठिय्या आंदोलन
दरम्यान एक वकील सहकारी यांना झालेल्या घटनेचा निषेध करीत शहर पोलिस ठाणे येथे वकील संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
